कराटे असोसिएशन चांदुर रेल्वे, महात्मा फुले प्रशिक्षण केंद्र व हेल्थ क्लब चांदुर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम विदर्भ खुली कराटे स्पर्धा २०२४ क्रीडासंकुल, चांदूर रेल्वे येथे संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, नागपूर, पुलगाव सह अनेक ठिकाणाहून कराटेपटूंनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश विश्वकर्मा अध्यक्ष जय हिंद क्रीडा मंडळ यांच्याहस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास आठवले यांची उपस्थिती होती. सदरच्या स्पर्धेमध्ये काता व कुमिती असे वयोगट करण्यात आले. ज्यामध्ये १४ वर्षाखालील तसेच १८ वर्षावरील खेडाळुचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये खेळाडू निशांत मानके, गायत्री भोयर, स्वरा कोंडे, प्राजक्ता नन्नवरे, प्रबुद्ध वानखडे यथार्थ सातपुडे, आदिल शेख, प्रज्ञा ढोबळे, सोयल कुरेशी, स्वरा दुबे, खुशी, तन्वी पानेकर, सृष्टी पवार या विद्यार्थ्यांनी काता व कमिती मध्ये गोल्ड मेडल्स पटकावले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात आले असून सर्व कराटे प्रशिक्षक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन मंगेश कुमरे, सचिन मून, देवेंद्र मेश्राम, अमोल बोबडे, संजय आठवले, राहुल नेवारे, पायल पांडव, मुकेश भुयार यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजित समिती यांनी अथक प्रयत्न केले..
Add Comment