धामणगाव रेल्वे

वुशू स्पर्धेत से.फ.ला. विद्यालयाच्या विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी ; राज्य स्तरासाठी पात्र

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विभागीय स्पर्धांमध्ये वुशू (मिक्स मार्शल आर्ट) या क्रीडा प्रकाराची स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत धामणगाव येथील सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी आपापल्या वयोगट व वजनी गटांत प्रथम क्रमांक पटकावत राज्य स्तरावर सहभागी होण्याचा मान मिळवला आहे.

ही स्पर्धा दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हंसिका महानुर आणि तृप्ती ठाकरे या विद्यार्थिनींनी व आफताब शहा या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले. या यशामागे शारीरिक शिक्षक शोभेराम जावरकर, सौरभ पांडेय व मरापे यांचे मार्गदर्शन व मेहनत महत्त्वाची ठरली. विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण सराव व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले..

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व तसेच सतत तीन वर्षापासून राज्यस्तरावर पात्र ठरल्याबद्दल से.फ.ला. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रमोद हातेकर तसेच पर्यवेक्षक नरेश कावलकर यांनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे संपूर्ण धामणगाव शहरातून विद्यार्थिनी व शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!