धामणगाव रेल्वे

छत्रपती युवा गणेश मंडळातर्फे विध्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित

वर्ग ८ ते १२ साठी चित्रकला तर ५ ते ७ साठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन

धामणगाव रेल्वे

दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती युवा गणेश मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी वर्ग ८ ते १२ मधील विद्यांर्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये १ ) ऑपरेशन कवचं अंतर्गत व्यसनमुक्ती निरोगी जीवनाचा मार्ग. २) स्वच्छ भारत अभियान आपले शहर आपली जबाबदारी. ३) झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा जीवन वाचवा. ४) प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण रक्षण या विषयावर चित्र काढायचे आहे. तसेच वर्ग ५ ते ७ या विद्यार्थ्यांमध्ये गणपती चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर प्रथम द्वितीय आणि तृतीय आर्कषित बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आले आहे. दोन्ही स्पर्धा रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत छत्रपती युवा गणेश मंडळ भंडारी ले आउट जे बी पार्क जवळ होणार आहे.

सदरच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर अधिक माहितीकरिता ऋषी जगताप – ९८९०६१८२००, कार्तिक इंगोले – ८६००९७८१५५, वेदांत रोंघे – ९८६०६००६२३, अजय तिवारी- ७२१८७२४०७९ यांच्याशी संपर्क साधावा..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!