प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे
जिल्हा परिषद शाळा शेंदुरजना खुर्द मध्ये मोठ्या उत्साहाने ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये ध्वजारोहण व सत्कार समारंभ व तसेच शिवकालीन पुराण प्रदर्शनी आणि डान्स अशाप्रकारे विविध उपक्रम राबविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ अरुणाताई विनोद चटुले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शितलताई संतोष समोसे (सरपंच) व सुनील जांबवाले (उपसरपंच) आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रताप अडसळ (आमदार) व महादेव समोसे (मा.उपसभापती पं.स) बाळासाहेब शिरपूरकर (मा.सरपंच) सौ हर्षदाताई धोटे (मा.सरपंच) गणेश नागोराव गावंडे (मुख्याध्यापक जि.प.शाळा) श्री मनोहरराव तुपट (शा.व्य.स.उपाध्यक्ष) अतुलभाऊ देशमुख (मा.उपसभापती) आणि श्री प्रकाश माणिकराव वाढे (मा.केंद्र प्रमुख) व तसेच ग्रामपंचायत व जि.प.शाळा कडून आमदार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व प्रदर्शनी व तसेच उत्कृष्ट काम केल्याबद्दल आमदार यांनी सौ. शिक्षिका कांचन मकरंद खेडकर यांचा सत्कार केला. आणि अशाच प्रकारे गावकऱ्यांनी खूप छान प्रतिसाद देऊन कार्यक्रम पार पडला.













Add Comment