आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

६८ लाभार्थ्यांनी घेतला रामगाव येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अल्पेश बनसोड व मित्र परिवार यांनी आयोजित केले होते तपासणी शिबीर

धामणगाव रेल्वे 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ९ डिसेंबर रोजी रामगाव येथील बुद्ध विहारामध्ये नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे अल्पेश बनसोड व मित्र परिवाराने आयोजन केले होते.

यामध्ये जनरल फिजिशियन व सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. स्वप्नील वाकेकर आणि त्वचारोग तज्ञ् डॉ. कोमल वाकेकर ( राऊत ) यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील ६८ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.

सर्वप्रथम डॉ. स्वप्नील वाकेकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून शिबराला सुरुवात केली. त्यानंतर नागरिकांनी एक एक करून आपली समस्या दोन्ही डॉक्टरांपुढे मांडल्या. सदरच्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अल्पेश बनसोड यांनी विशेष मेहनत घेतली…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!