क्राईम धामणगाव रेल्वे

५० वर्षीय इसामाकडून ७ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

धामणगाव रेल्वे

दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ ते १: ३० च्या दरम्यान अवघ्या सात वर्षीय चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून तिला घरात नेत आपण खेळ खेळू म्हणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न एका ५० वर्षीय नराधमाकडून करण्यात आला. तसेच आपण खेळलेला खेळ कुणालाही सांगू नको असे त्या चिमुकलीला सांगितले. परंतु मुलीने घडलेला प्रसंग आपल्या आईला सांगितला..
त्यामुळे पीडितेच्या आईने दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार आरोपी नरेश देविदास चौधरी वय – ५० रा. हिरापूर यांच्याविरुद्ध कलम ७४/७५ ( १ ) बीएनएस कलम ८, १० बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दत्तापूर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!