धामणगाव रेल्वे

जनरल स्टोअर्स मध्ये खरेदी करण्याकरिता आलेल्या महिलेच्या पर्समधून लांबविली १५ हजार रोख

घटना सीसीटीव्हीत कैद, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे 

मकर संक्रांत सनानिम्मित धामणगावात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेनेच चक्क १५००० रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली असून सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

मेन लाईन मधील एका जनरल स्टोअर्स येथे दि. १४ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ४ : १५ दरम्यान एका महिलेने सामानाची खरेदी केल्यानंतर पैसे देण्याकरिता पर्स तपासली असता त्यामधले १५ हजार रुपये मिळून आले नाही, त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. कुणीतरी पैसे चोरल्याची महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही चेक केले असता तक्रारदार महिलेच्या पर्समधून फिक्कट पिवळ्या रंगाच्या स्टोल ज्यावर लाल रंगाचे बुट्टे असलेल्या तसेच डोक्यावर पदर घातलेल्या महिला कडून पर्समधील पैसे चोरी करीत असल्याची घटना कैद झाली असल्याने ५३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात घेण्यात आला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!