खेळ / क्रीडा धामणगाव रेल्वे

यशदीप संजय भोगे ठरला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा मानकरी..

जळगाव आर्वीच्या शिरपेचात मनाचा तुरा

धमगणाव रेल्वे –

जळगांव आर्वितील लहानशा गावातुन भोगे कुटुंबातील यशदीपने जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात उत्कृष्ट खेळाडू असल्याचा मान मिळवला असुन यशदीपला महाराष्ट्र शासनाचा महामहीम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन जी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंदजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) मिळाला असुन गावातून प्रत्येक नागरिकाकडून त्याचे कौतुक केल्या जात आहे.

     यशदिप संजयराव भोगे याने एल.एल.बी शिक्षण पुर्ण केले असुन सध्या ईस्ट रेल्वे कोलकाता येथे कार्यरत आहे. वडील प्रो.डॉ.संजय हरिदास भोगे हे डॉ.पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजला कार्यरत होते. यशदीप ने आर्चरी या खेळात २०२३- २४ या वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करिता महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा (खेळाडू) पुरस्कार मिळाल्याबद्दल यशदिपचे सर्वांकडून कौतुक होत आहे व सर्वांच्या शुभेच्छा सुद्धा मिळत आहे…

भारताकडून ऑलिंपिक २०२८ करिता सुरू आहे तयारी

२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेकरिता यशदीप स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) सोनीपत, हरियाणा ट्रेनिंग सेंटर सेंट्रल गव्हर्टमेंट कडून सराव करत आहे. सध्या यशदीप भारताच्या टॉप ८ मधे खेळत आहे. या पुर्वी जिल्हा क्रीडा उत्कृष्ट खेळाडू अमरावती पालकमंत्री मा.श्री.प्रविणजी पोटे साहेबांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला असून त्याच्या कडे एशिया कप, नॅशनल मेडल अशा प्रकारचे १५० च्या वर मेडल आहेत..

यशदीपला मिळालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामुळे भोगे कुटुंबाचे व जळगांव आर्वीचे नाव महाराष्ट्रात झळकल्याने आम्हाला त्यांचा अभिमान असुन २०२८ मधे ऑलिंपिक करिता आर्चरी गेम खेळण्याकरिता भारताकडून यशदीपची निवड व्हावी, याकरिता सर्वांच्या शुभेच्छा आम्ही यशदीपला देतो

  – अतुल सुधाकरराव भोगे (ग्रा.पं सदस्य, जळगांव आर्वी)

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!