ऑरेंज सिटी थॅलेसेमिया निर्मूलन समितीचा उपक्रम
अमरावती / वरूड :- निलेश निंबाळकर
थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वरुड शहरातील सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मूलन समिती, वरुड द्वारा थॅलेसेमिया जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाकरिता अमरावती जिल्हा थॅलिसिमिया निर्मूलन समितीचे अध्यक्ष दलवीरसिंग व्यास व उपाध्यक्ष विकास काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मूलन समिती वरुडचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बाईक रॅली ची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांना हारार्पन व पूजन करून करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी थॅलेसिमियाबाबत माहिती देऊन यावर कोणते उपाय करता येतील याबाबत मार्गदर्शन केले.














Add Comment