क्राईम

शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत चौथीच्या मुलीला बनविले वासनांची शिकार

शिक्षकच बनला भक्षक

जनसुर्या मीडिया : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. खासगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासच्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
सुभाष जाधव असं आरोपी शिक्षकाचं नाव असून दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस नावाने आरोपीची शिकवणी आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत नराधमाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सुभाष जाधव असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस या नावानं आरोपीची शिकवणी आहे. एम.ए इंग्रजी एम.एड असलेल्या सुभाष जाधवसह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती. तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!