येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे १४ जून २०२६ रोजी ग्राम उदखेड परिसरातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान एकूण १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, मोटर सायकल, एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १९ लाख २० हजार ७५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१२ आरोपीना अटक
सदर प्रकरणी यश अनिल बागडे वय २४ वर्ष, आकाश दिपक खराले वय २९, विशाल बलराम धुर्वे वय २४, दिपरंजीत बजरंगसिंग गहरवाल वय ४०, परवेज शेख याकुब शेख वय २५, महेश रमेशराव बानाईत वय ३८, मोहम्मद शेहबाज शेख मेहबु पटेल वय ४९, शेख समीर शेख सलीम वय २६, अब्दुल नदीम अब्दुल नबी वय ३८, अब्दुल एजाज अब्दुल अजिम वय ४७, जहीर खान हुसैन खान वय ४०, अनिल गुलाबराव पाटील वय ५० अशा एकूण १२ आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सदर ची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम,अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, ऋषिकेश टेकाडे,नयन शाहाकार व अथर्व कोहळे यांनी केली.
यावेळी पोलीस स्टेशन मोर्शी येथील ठाणेदार यांनी नागरिकांना आवाहन केले की,परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, जुगार, सट्टा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
Add Comment