पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १६ जून २०२६ रोजी स्विपर कॉलनी, मोर्शी येथे पोलिसांकडून छापा टाकण्यात आला असताना कारवाईदरम्यान दिलबारसिंग मोतीसिंग बावरी (वय ५२ वर्षे, रा. स्विपर कॉलनी, मोर्शी, याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. घरातील खोलीत लपवून ठेवलेला देशी दारूचा साठा आढळून आला. सदर कारवाईत एकूण २४८ नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ११ हजार सांगण्यात येत आहे . जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन मोर्शी करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांचे अधिनस्त पो.उप.नि तुषार चव्हाण, पो.अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे यांनी केली आहे.
Add Comment