दिलेल्या मागण्यांवर ठोस पावले न उचलल्यास तहसीलच्या आत ठिय्या आंदोलन करणार – वीरेंद्र जगताप, माजी आमदार
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आज रोजी तहसील कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. या मध्ये निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकरी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन रक्कम द्यावी, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले अनुदान, त्वरित वाटप करावे, घरगुती तसेच शेतीपपंचा वीजपुरवठा सुरळीत करावा, निवडणूक आधी उद्घाटन केलेले पांधन रस्ते चे कामे त्वरित सुरू करावे, तसेच मुख्य मार्गावरून गावा गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करावे, संत्रा मोसंबी या पिकाचे अनुदानित वितरित करावे, या बाबींचा समवेश होता.














Add Comment