यवतमाळ

कारागृहातील कैद्याच्या टोळीचा अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ला

यवतमाळ कारागृहातील धक्कादायक घटना

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

न्यायाधीन बंदीला प्रतिबंधीत असलेल्या ठिकाणी जाण्यास रोखणाऱ्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला त्या बंदीच्या टोळीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटनामंगळवारी (ता. ७) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्हा कारागृहात घडली.
ओंकार कुंडले वय २२ वर्ष रा. पुणे, जुनेद फारुख शेख वय ३५, सतपाल रुपनवार वय ३५, नयनेश उर्फ नयन निकम वय ३३ वर्ष, आकाश उर्फ गुड्डु भालेराव वय ३० वर्ष, साहेल महेबुब बादशहा शेख वय ४० वर्ष, मनोज शिरशीकर वय २८ वर्ष, नामदेव नाईक वय २५ वर्ष असे मारहाण करणाऱ्या बंदींची नावे आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, तुरुंग अधिकारी धनाजी शिवाजीराव हुलगुंडे वय ४२ वर्ष रा. कारागृह अधिकारी वसाहत यांनी याबाबत अवधुतवाडी ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनूसार, मंगळवार न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा कारागृहात प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात जात होता. यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृहातील कर्मचारी सुरज मसराम यांनी त्याला त्या ठिकाणी जाण्यास रोखले. त्यामूळे बंदी कुंडले हा अरेरावी करीत त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच कर्मचाऱ्यांच्या हातातील फायबर लाठी हिसकावून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा न्यायधीन बंदी कुंडले यांचे अन्य साथीदारांनी दोन्ही शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत हुलगुंडे यांना डावे हाताचे बोटाला, उजवे हाताचे मनगटाला, छातीला, मानेला, पाठेला आणि सुरज मसराम यांना मानेला आणि दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे. घटनेनंतर तुरुंग अधिकारी हुलगुंडे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!