अमरावती

पोलिसांच्या सतर्कतेने अमरावतीच्या व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्‍न फसला

नागपूर – जनसूर्या, मीडिया

उपराजधानीतील रामदासपेठ या अतिशय वर्दळीच्या परिसरात जैन मंदिरामागे अमरावती येथील एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा कट पोलिसांनी वेळेत उधळून लावला. हे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून एक महिला व एक पुरुष असे दोघेजण फरार आहेत.
महावीर कोठारी असे या व्यापाऱ्याचे नाव असून हे अपहरण आर्थिक व्यवहारातून झाल्याचे उघड झाले असले तरी रात्री उशिरापर्यंत नेमके कारण पुढे आलेले नव्हते.
दोन दिवसापूर्वी एका रेस्टॉरंट मालकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली. आज एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने नागपुरातील व्यावसायिक दहशतीत आहेत. रात्री सातच्या सुमारास दुचाकीवर जात असताना महावीर कोठारी यांचा पाठलाग करीत त्यांना मारहाण करीत एका कारमध्ये डांबून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आरडाओरड झाल्याने वेळीच हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सावधगिरी बाळगत तातडीने सलमान खान नामक एका आरोपीस अमरावती मार्गावर परिसरात ताब्यात घेतले.
दरम्यान, अजहर पठाण आणि त्याची सहकारी पिंकी ही दोघेही पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारक सलमान खानकडून महावीर कोठारी यांनी एक लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. याच पैशाच्या वसुलीसाठी सलमान आणि सहकाऱ्यांनी अपहरणाचा रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेळीच हस्तक्षेप करीत आरोपीस ताब्यात घेण्यात आले असते तर या प्रकरणात हत्या देखील होऊ शकली असती. आता विविध पथके आरोपीच्या शोधात आहेत महावीर कोठारी यांनी अमरावती येथे देखील अनेकांकडून व्यवसायाच्या निमित्ताने आगाऊ पैसे घेतल्याची माहिती असून पोलीस तपासात याविषयीचा अधिक उलगडा होणार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!