अमरावती

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची आज आढावा बैठक

अमरावती (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक बुधवार(ता. दोन) रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
आढावा बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे जिल्हा कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात येणार असून जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांन मधून कार्यकारिणीची निवड विदर्भ अध्यक्ष करणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती शहराध्यक्ष विक्रम ढोके यांनी केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!