क्राईम

केवळ धक्का लागला म्हणून १३ वर्षांच्या मुलाची मारहाण करीत गळा चिरून हत्या

दोघांना अटक ; तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु

जनसूर्या मीडिया

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन याच्या हत्या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३६ तासात गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली. तर तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला. मात्र केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली. तिन्ही आरोपी रिंगणगाव परिसरात रखवालीसाठी मध्य प्रदेशातून आले होते. मंगळवारी एरंडोल तालुक्यातल्या रिंगणगाव येथील बेपत्ता १३ वर्षीय तेजसचा मृतदेह शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तेजस १६ जून रोजी वडील जळगाव येथे गेल्याने वडिलांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून घरा कडे निघाला होता.
मात्र रात्री उशीरापर्यंत तेजस घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. अखेर एरंडोल पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर रिंगणगाव गावाजवळच झुडपांमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांसमोरही हत्येचा छडा लावण्याचा मोठं आव्हान होते. आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!