क्राईम

इसमाची दगडाने ठेचून क्रूर हत्या, चोवीस तासात हत्येची दुसरी घटना

यवतमाळ :  प्रतिनिधी

वाढती गुन्हेगारी हा एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. क्षुल्लक कारणांवरून एकामागून एक अशा खुनाच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात मागील चोवीस तासात दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. यात यवतमाळच्या नेर तालुक्यातील मुकिंदपूर येथे एका इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील मुकिंदरपूर येथे सदरची घटना उघडकीस आली आहे. यात गावातील हरेश्वर मोतीराम निकोडे (वय ४२) असे घटनेत मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान आज सायंकाळी साडेपाच दरम्यान मुकिंदपूर पारधी बेड्या लगत फत्तू मोतीराम पवार यांच्या शेतात दगडाने ठेचून छिन्नविच्छिन्न रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. यामध्ये मृतकाच्या शरीरावर दगडाने वार केल्याचे व्रण आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

शेतात मृतदेह असल्याचे लक्षात येताच काही ग्रामस्थांनी याची माहिती नेर पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या अनुषंगाने पोलिसांकडून तपासाला सुरवात कारणात आली असून याचा उलगडा पोलिस तपासातूनच समोर येईल.

गावात चोवीस तासात दुसरी घटना

यवतमाळ जिल्ह्यातील मुकिंदरपूर या गावात मागील चोवीस तासात खून झाल्याची दुसरी घटना घडली आहे. चोवीस तासांत दुसरे हत्याकांड समोर आल्यामुळे गावासह नेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या दोन्ही खुनाच्या घटनेत एकाच व्यक्तीचा समावेश आहे, कि कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र पहिल्या घटनेचा तपास पूर्ण झाला नसताना दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!