प्रशासन कार्यवाही

अवैध धंद्यावर तहसीलदार अभय घोरपडे यांचे धाडसत्र सुरूच

विना परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

धामणगाव रेल्वे

मागील काही दिवसापासून सतत प्रशासनाला चॅलेंज देणाऱ्या महा ठगांना तहसीलदार अभय घोरपडे यांनी चांगलेलंच धारेवर धरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचे कारणही तसेच असून आठवड्यातून कधी ट्रक तर कधी ट्रॅक्टर द्वारे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या तहसीलदारांच्या टीम ने आवळल्या आहे. सतत धाडसत्र सुरु असतानादेखील अवैध धंदेवाले या कारवाईला जुमानत असल्याचे चित्र दिसत होते. त्या अनुषंगानेच दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजता मौजा चिंचोली गावात अवैध गौण खनिज वाहतूक करतांना एम एच ३२ पी ०२८२ क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला महसूल पथकाला मिळून आला. सदर ट्रॅक्टर थांबवला असता ट्रॅक्टर चालक राजू मारोती नारंवरे रा चिंचोली यास अवैध रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.
अवैध गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा सतीश अडकणे रा. चिंचोली यांच्या मालकीचा असून, सदर रेती मौजा चिंचोली घाटातून मौजा चिंचोली येथे घेऊन जात असल्याचे टॅक्टर चालक यांनी सांगितले. सदर ट्रॅक्टर चा व रेतीचा पंचा समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून दंडात्मक कारवाई करिता सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेला आहे.
सदर गौण खनिज पथकाच्या कारवाई मध्ये  तहसीलदार अभय घोरपडे, मंडळ अधिकारी नरेश उईके ग्राम महसूल अधिकारी विनोद मस्के व सागर भांडवले व कोतवाल संजय इरपाते हजर होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!