दरवर्षी पिकांची हानी, नुकसानभरपाई व कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी):
मौजा गावंडगाव बु. येथील शेतकरी दरवर्षी पाण्याच्या तडाख्यामुळे शेती आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहेत. चिंचोली बु. ते गावंडगाव बु. या मार्गाने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे पाणी थेट शेतात घुसत असल्याने शेती खरडून जाते आणि पिकांचा विलय होतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करून तातडीने नुकसानभरपाई आणि वाहत्या पाण्याच्या कायमस्वरूपी विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती
गावंडगाव बु. येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून प्रत्येकाकडे सरासरी १.५० हेक्टर इतकीच शेती आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांची आर्थिक स्थिती डगमगली असून, यापूर्वी अनेकदा पिकांचे नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तलाठी व कृषी सेवक यांनी काही वेळा पाहणी केली असली तरी अहवाल शेतकऱ्यांना मिळाला नाही किंवा त्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.














Add Comment