विदर्भ शेतकरी सक्षमिकरण कार्यक्रम
चांदुर रेल्वे – प्रतिनिधी
विदर्भ विभागातील शेतकरी यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा वापर करुन वर्मी कंपोस्ट चे बेड तयार करुन सेंद्रिय पद्दतीने शेती करावे असे मनोगत हर्षद ठक्कर अध्यक्ष रोटरी क्लब मिड सिटी मुंबई यांनी दिनांक २२ मार्च रोजी साईबाबा ग्रामीण विकास संस्था, चांदुर रेल्वे, रोटरी क्लब, बोंबे मिड सिटी मुबंई, माता बाल संगोपन संस्था मुबंई,सारथ फॉउंडेशन यांच्या संयुक्त शाश्वत विकास केंद्र सोनगाव रोड येथे विदर्भ शेतकरी सक्ष्मीकरन अभियान च्या विदर्भ स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये मत व्यक्त केले.
या प्रशिक्षण मध्ये उदघाट्न प्रसंगी मा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पी.आर.ओ नितीन कुळकर्णी, हर्षद ठक्कर, अध्यक्ष रोटरी क्लब मुंबई, प्रा घनश्याम दरणे, यवतमाळ, बंडू आंबटकर सयोजक ग्रामसेवा लोक अभियान ( विदर्भ ) गोपाल देवकर, बुलढाणा, दिलीप बिसेन यांची उपस्थिती होती, या प्रशिक्षण ला विदर्भ विभागातून शेतकऱ्यांना बरोबर कार्य करणाऱ्या २५ सेवाभावी संस्था व ३० शेतकरी उपस्थित होते.














Add Comment