जिल्हा सामान्य रुग्णालय व डायबेटिक असोसिएशन अमरावती यांचें संयुक्त विद्यमानाने व प.दे.स्मृति वैद्यकीय महाविद्यालय यांचें सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी बालमधुमेही करीता निःशुल्क औषध उपचार केंद्र हे शुक्रवार, दि. ६ जुन,२०२५ रोजी सकाळी १० ते १२.०० या कालावधीत सुरु राहणार आहे. सदर बाब लक्षात घेऊन पालकांनी, मधुमेह नि:शुल्क उपचार व औषधी केंद्र, वार्ड क्रमांक ९ च्या बाजूला, ओपीडी क्र.५१, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे आपल्या बाल मधुमेहींना ( वयवर्ष २५ खालील) निर्धारीत वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सुचीत करावे.
उपचार केंद्रावर निःशुल्क आवश्यकतेनुसार तज्ञांच्या सल्ल्याने इन्सुलिन इंजेक्शन, सिरींज देण्यात येतील. प्रथमत: येणा-या मधुमेहींना नारंगी रंगाचे रेषण कार्ड, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, सुरु असलेल्या औषधीची डॉक्टरची कागदपत्रे, हे सर्व दोन प्रतीत झेरॉक्स स्वरूपात व मुळप्रतीसह सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळीं प्रथम, मुख्य प्रवेश द्वारावर ओपीडी काउंटर वर नोंद करुन ओपीडी कार्ड घ्यावे लागेल. मधुमेहींना मार्गदर्शन व तपासणी करीता मधुमेहतज्ञ डॉ. राहुल मोपारी व बालरोगतज्ञ डॉ. सतीश तिवारी व आहारतज्ञ डॉ.दिपाली भैसे हे याप्रसंगी उपस्थित राहतील.
यापुर्वी ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनी फक्त या उपचार केंद्रावर दिलेल्या औषधीचे कागदपत्रे फाईल मध्ये सोबत आणावी. याबाबत कृपया नोंद घेवून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालय तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, व डायबेटिक असोसिएशन तर्फे अध्यक्ष डॉ अजय डफळे, सचिव डॉ मिलिंद जगताप, जनसंपर्क अधिकारी राजेश पिदडी यांनी केले आहे.
Add Comment