अमरावती क्राईम

अमरावतीमधील पोलीस पित्याने पोटच्या २४ वर्षीय पोरीवर केला लैंगिक अत्याचार

पोलीस दलात काम करणारा रक्षक बाप स्वतःच्या मुलीसाठीच भक्षक ठरला

अमरावती प्रतिनिधी

अमरावतीत वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसात कार्यरत असणाऱ्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पित्याविरोधात बलात्कार विनयभंग पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठीच भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमके प्रकरण काय ?
अमरावतीत पोटच्या मुलीवर पोलीस पित्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २४ वर्षीय पीडित तरुणीने पोलीस पित्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस विभागाने तातडीने गुन्हा दाखल केला असून एकीकडे समाजात रक्षणकर्त्याची भूमिका निभवणाऱ्या पोलिसाचाच असा गृहस्पद चेहरा समोर आल्याने नागरिकांमध्ये ही संतापाची लाट उसळली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरोधात विनयभंग बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत. पोटच्या पोरीसाठीच भक्षक झालेल्या नरधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!