अमरावती

दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

वडनेर-लोणी मार्गावर घडली होती लुटीची घटना

अमरावती प्रतिनिधी

वडनेर-लोणी मार्गावरील हायवेवर एका ५५ वर्षीय व्यक्तीला अडवून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अकोल्यातील ३ तरुण आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, ​ रितेश केशव महापात्रा (वय २४ वर्षे, रा. खडकी, अकोला), गौरव विनोद डोंगरे (वय १९ वर्षे, रा. खडकी, अकोला), श्रेयस उमेश इंगळे (वय २० वर्षे, रा. कानेरी, ता. जि. अकोला), एक विधिसंघर्षग्रस्त बालक (रा. खडकी, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून रोख रक्कम: २,००० रुपये, ​गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल एम एच 30 बी वाय २४८० – किंमत ५५ हजार ३ मोबाईल हँडसेट – किंमत ४५हजार , ​पावर बँक – किंमत १ हजार असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून ​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनील एकनाथराव अजमिरे वय -५५ वर्षीय हे ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने एम एच २७ डी एन ४८६२ अमरावतीवरून वडनेर-लोणी मार्गाने जात होते. हायवेवरील ‘vjv’ फार्मजवळ चार अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले आणि चालत्या गाडीची चावी काढून गाडी बंद पाडली. आरोपींनी अजमिरे यांच्या खिशातील मोबाईल व गाडीची चावी शेतात फेकून दिली आणि शर्टच्या खिशातील २,००० रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलीस स्टेशन लोणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.​ तपासादरम्यान, ९ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर लुटमार खडकी (अकोला) येथील रितेश महापात्रा याने त्याच्या साथीदारांसह केली असून ते अकोला रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहेत. एलसीबीच्या पथकाने तातडीने अकोला गाठून ऑटो पार्किंग जवळून संशयितरित्या फिरणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ४ ऑगस्टच्या रात्री अमरावती शहरात रात्रभर फिरल्यानंतर, परतताना पैशांसाठी त्यांनी या लुटमारीचा बेत आखल्याचे समोर आले.

​सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. रोहित कुदळे, पोलीस अंमलदार सुधीर बावणे, गजेंद्र ठाकरे, सचिन नायबने, रवींद्र वऱ्हाडे, निलेश डांगोरे, शाम गावंडे, चालक संजय प्रधान आणि सायबर पोलीस ठाण्याचे प्रवीण अंबाडकर व गुणवंत शिरसाठ यांनी ही यशस्वी कारवाई केली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!