अमरावती

धामणगाव, चांदुर रेल्वे, कुऱ्हा हद्दीतील सोलर प्लांट आणि केबल चोरणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने आवळल्या मुसक्या ; ४ आरोपी अटकेत, २ फरार ; दोन भंगार विक्रेत्यांचा सुद्धा समावेश

अमरावती प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे , चांदूर रेल्वे आणि कुऱ्हा पोलीस स्टेशन च्या हद्दीत सोलर प्लांट आणि शेतातील केबल चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून ४ आरोपीना अटक केली आहे. तर अद्याप २ आरोपी फरार आहे. दोन भंगार विकत घेणाऱ्या भंगार विक्रेत्यांना सुद्धा अटक करून आरोपींकडून चोरी चा केबल जाळून काढलेले तांबे, वाहने आणि मोबाईल असा एकूण १६,९१, २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीमध्ये १) रुतेश मनचरण भोसले (वय २५, रा. तरोडा, चांदूर रेल्वे) २) अश्विन सुरेंद्र भोसले (वय २२, रा. शिवाजी नगर, चांदूर रेल्वे) ३) फैजान शहा रहमत शहा (वय २०, रा. बिस्मिल्ला नगर, अमरावती भंगारवाला) ४) अफान खान इरफान खान (वय १९, रा. गुलिस्ता नगर, अमरावती भंगारवाला) ५) राहुल सुंभर भोसले (वय २५) ६) सुंभर सनातन भोसले (वय ४८, दोघे रा. राजीव गांधी नगर, चांदूर रेल्वे) इत्यादींचा समावेश आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राम सोनगाव (ता. चांदूर रेल्वे) येथील सोलर प्लांटवर दिनांक ७ ऑगस्ट २०२६ च्या रात्री ८:०० ते ८ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी ६:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून सुमारे २,३०,००० रुपये किमतीचे लाल-काळ्या रंगाचे केबल, डी.सी. केबल आणि केबल हॉरनेस वायर चोरी केले होते. याप्रकरणी कंपनीचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर सहदेवराव रामराव चौधरी (वय ३६, रा. चांदूर रेल्वे) यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चांदूर रेल्वे येथे अप. क्र. २९८/२६ कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पथकाने संशयावरून आरोपी रुतेश मनचरण भोसले रा. तरोडा, चांदुर रेल्वे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलर प्लांट व शेतातून केबल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला केबल जाळून त्यातील तांब्याची तार अमरावतीच्या भंगार विक्रेत्यांना विकल्याचे आरोपीने निष्पन्न केले.
जप्त केलेला मुद्देमाल मध्ये १) तांबे धातू केबलः १४० किलो (किंमत ₹२,१०,०००/-) २) वाहनेः गुन्ह्यात वापरलेल्या ४ मोटारसायकल (किंमत ₹२,३०,०००/-) व १ तीनचाकी टेम्पो (किंमत १२,००,०००/-) ३) मोबाईल: ३ अँड्रॉइड मोबाईल फोन (किंमत ₹३२,०००/-) ४) इतर: केबल चोरीसाठी वापरलेले साहित्य. असा एकूण १६,९१, २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील एकूण ५ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेतः
पो.स्टे. चांदूर रेल्वेः अप. क्र. २९८/२६ आणि अप. क्र. ३०७/२६
पो.स्टे. धामणगाव रेल्वेः अप. क्र. ८१/२६ आणि अप. क्र. २०६/२६
पो.स्टे. कुऱ्हाः अप. क्र. २५/२५
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम व अप्पर पोलीस अधीक्षक  दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाई पथकामध्ये  पीएसआय रोहित कुदळे, एएसआय मनोज चचेरे, पोलीस अंमलदार निलेश डांगोरे, सुधीर बावणे, शिवाजी घुगे, सचिन गायधने, श्याम गावंडे, दिनेश कनोजिया एएसआय संजय प्रधान यांनी ही कामगिरी बजावली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!