धामणगाव रेल्वे

बेंबळा नदीकाठच्या गावठी दारूभट्टी वर तळेगाव द पोलिसांची कारवाई ; आरोपी महिलेला अटक

ठाणेदार किरण औटे यांच्या नेतृत्वात ४८ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त

धामणगाव रेल्वे 

अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तळेगाव दशासर पोलिसांनी बेलोरा शेतशिवारातील बेंबळा नदीच्या काठावरील गावठी हातभट्टीवर धडक कारवाई करत दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक महिला दारू गाळताना रंगेहात आढळून आली असून तिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पंचांसह छापा टाकण्यात आला. पंचनामा दरम्यान ११ लिटर तयार हातभट्टी दारू, २१० लिटर मोहमाचा सडवा, ८ किलो युरिया आणि १ किलो नवसागर असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान हातभट्टी दारूची नशा वाढविण्यासाठी युरिया व नवसागराचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली. हे पदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून अशा प्रकारे तयार करण्यात आलेली दारू विषारी ठरून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ), ६५(क), ६५(ड) व ६५(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असता महिलेला जिल्हा कारागृह अमरावती येथे पाठविण्याचे आदेश दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम अमरावती ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाद, उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक खरात यांच्या मार्गदर्शनात तळेगाव द पोलीस स्टेशन चे ठाणेदार किरण औटे सह त्यांच्या पथकाने केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!