धामणगाव रेल्वे

२१ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक कार्क्रमात धामणगावातील सप्तरंग कथक अकॅडमीने पटकाविला तिसरा क्रमांक

नृत्य शिक्षिका सौ. शुभांगी इंगळे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे सुयश

धामणगाव रेल्वे

दि. २१ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपुर द्वारा आयोजित तीन दिवसीय नृत्य स्पर्धा महोत्सव श्री साई सभागृह शंकर नगर,नागपुर येथे पार पडला. सदर महोत्सवात धामणगाव शहरातील सप्तरंग कथक अकॅडमीने कथक स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. या उज्वल यशामुळे धामणगाव रेल्वेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विविध राज्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडी, कथ्थक, सेमीक्लासिकल, फोक डान्स, हिप हॉप इत्यादी नृत्य प्रकारांचा समावेश होता.
सप्तरंग कथ्थक अकॅडमी धामणगाव रेल्वेच्या विद्यार्थिनी कु.आर्या वरकड, उर्वी राजनकर, सावी राठोड, नित्या पाटमासे, चार्वी पनपालिया, वंशिका पनपालिया, प्रिशा राठी, शिवांशी यादव, श्रावणी झटाले, मंजिरी वडनेरकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

तसेच सप्तरंग कथक अकॅडमीच्या सेमी क्लासिकल ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. सप्तरंग कथक अकॅडमी सेमी क्लासिकल ग्रुप मध्ये कु. रुहीका पणपालिया,अनिका राठी, साची मुंदडा, उर्वी राजनकर, राजवी पोळ, सावी राठोड, राजवी मस्के, परिधी चव्हाण, अनन्या गांजरे. या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सप्तरंग कथक अकॅडमी धामणगाव रेल्वे च्या नृत्य शिक्षिका सौ. शुभांगी इंगळे तसेच पालकांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!