क्राईम धक्कादायक

दीर आणि सासऱ्याच्या मतिमंद सुनेवर वारंवार अत्याचार ; विरुळ रोंघे येथील घटना

पोलिसात गुन्हा दाखल – सासरा अटकेत

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील विरुळ रोंघे गावात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ६९ वर्षीय सासऱ्यासह दिराने आपल्या मतिमंद सुनेवर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने चांदुर रेल्वे पोलिसात केली असून आरोपी हनुमंत तुकाराम बावणे वय- ६९ , यादव हनुमंत बावणे रा. विरुळ रोंघे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ६४(२) क, ६४(२) म, भा. द. वि कलम ३७६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडितांचे ३ वर्षा अगोदर लक्ष्मण हनुमंत बावणे रा. विरुळ रोंघे ता. धामणगाव रेल्वे यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. पीडितांचे पती सुद्धा मतिमंद आहेत. दरम्यान मागील २ महिन्यापासून आरोपी सासरा आणि दीर हे पीडितांशी जबरदस्ती कपडे काढून शरीरसंबंध ठेवत असल्याचे माहिती पीडितेने आपल्या आईला दिली. त्यामुळे पीडितांच्या आईने चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची आपबिती सांगितली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात तातडीने गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील आरोपी सासरा हनुमंत तुकाराम बावणे याला अटक करण्यात आली आहे. तर दीर यादव हनुमंत बावणे फरार असल्याची माहिती प्राप्त आहे. अधिकचा तपास चांदुर रेल्वे पोलीस करीत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!