क्राईम धामणगाव रेल्वे

धामणगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ; चोरीसह वाहनांची तोडफोड

धामणगाव रेल्वे

शहरात १९ फेब्रुवारी च्या मध्यरात्री चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून एका किराणा दुकानाला फोडून काही वाहनातील पेट्रोल चोरीसह वाहनांची तोडफोड केल्याची घटना २० फेब्रुवारीच्या सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली आहे. यावेळी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही तरुण मुले संशयास्पदरित्या कॅमेरात कैद झाले आहे. या संदर्भात दत्तापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेन लाईन मधील किराणा दुकानात धाडसी चोरी ; ४८ हजाराचा मुद्देमाल लंपास

चोरटयांनी मेन लाईन मधील प्रदीपकुमार पवनकुमार किराणा मर्चंट या दुकानाला टार्गेट करीत दुकानातील गल्ल्यामधून २० चांदीचे सिक्के, कि. अंदाजे २० हजार, चिल्लर, नोटा रोख २३ हजार व शिव मंदिर दानपेटीतील ५ हजार असा एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आली असल्याने गिरीश राठी यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   चोरटयांनी किराणा दुकानातील गल्ला फोडून अस्तावस्त केलेले सामान 

 

तर दुसरीकडे जुना धामणगाव हद्दीतील राजधानी नगर, कॉलनीमधील शुभम पवार यांची गाडी फोडली असून तसेच होंडा शोरूम जवळ समुद्रीवर महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इनोव्हा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच २० ई जी २०२३ व बुलेरो वाहन क्रमांक एम एच १४ जी बी २२२३ च्या वाहनाच्या काचा फोडल्या आहे.  तसेच एका दुचाकी ( बुलेट ) मधून पेट्रोलची चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असल्याची बाब उघडकीस आली आहे. एकाच रात्रीतून घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांच्या या धाडसी कृत्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान दत्तापूर पोलिसांकडे उभे ठाकले आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!