धामणगाव रेल्वे

बसमधून नगदी ५००० व १ ग्राम सोने अज्ञाताने लांबविले

धामणगाव रेल्वे

धामणगाव वरून यवतमाळ साठी निघालेल्या बसमधून अज्ञात व्यक्तीने महिलेच्या पर्समधील नगदी ५ हजार व १ ग्राम सोन्याचे लॉकेट लांबविल्याची घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पवन काळे रा. जळगाव ता. धामणगाव रेल्वे हे आपल्या पत्नीसह धामणगावरून यवतमाळ जाण्यासाठी सायंकाळी ५ वाजता बसमध्ये बसले. त्यामध्ये गर्दीचा फायदा घेत एका संशयितरित्या महिलेने हातचलाखी करीत आपल्या पत्नीच्या पर्समधून नगदी ५ हजार व १ ग्राम सोन्याचे लॉकेट काढून घेतल्याचे त्यांच्या यवतमाळ येथे बसमधून उतरल्यावर लक्षात आले. त्यामुळे पवन काळे यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!