धामणगाव रेल्वे सामाजिक

जीवक वुद्ध विहार येथे तालुकास्तरीय धम्म उपासिका व समता सैनिक दल शिबिराचा समारोप

धामणगाव रेल्वे 

भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर, ग्रामीण शाखा धामणगाव रेल्वे अंतर्गत दि. १६ ते २५ जानेवारी पर्यंत १४ ठिकाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धम्म उपासिका शिबिराचे तसेच दि. २३ ते २५ जानेवारी पर्यंत समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिराचा एकत्रित समारोप व तालुकास्तरीय धम्म मेळावा जीवक बुद्ध विहार पुष्करणा नगर धामणगाव रेल्वे येथे दि. २५ जानेवारी रविवारला संपन्न झाला.

समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व उपासक उपासिका

सर्वप्रथम समता सैनिक दल यांच्या वतीने जीवन बुद्ध विहार पासून रॅली काढून नगरपरिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत सलामी देत जीवक बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या धम्म मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून विजय लोखंडे तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे, प्रमुख मार्गदर्शक अशोक केदारे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव मुंबई, विजयकुमार चोरपगार, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी प्रा. प्रकाश बोरकर जिल्हाध्यक्ष अमरावती पूर्व, प्रा. डॉ. मुकेश सरदार जिल्हाध्यक्ष अमरावती पश्चिम, मायाताई धांडे जिल्हाध्यक्ष महिला पूर्व, संगीताताई सरदार जिल्हाध्यक्ष महिला पश्चिम, राहुल गायकवाड तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून गणपतराव तिडके जिल्हा सरचिटणीस, माधुरीताई चोरपगार जिल्हा उपाध्यक्ष अमरावती, सुनीताताई हेंडवे तालुका अध्यक्ष महिला धामणगाव रेल्वे तसेच प्रशिक्षक म्हणून मेजर विजय हिवराळे, ज्योतीताई धुरंदर अकोला तसेच अमरावती पूर्व व पश्चिमचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदरहू तालुका धम्म मेळाव्याला उपस्थित म्हणून आयु. संजय घडीकर, पंकज मेंढे, अश्वघोष खोब्रागडे, गौतम चोरपगार, रूपचंद गुजर, विशाल सुटे, रामदास हाडे, अशोक हेंडवे, प्रदीप गोटे, सुनील मेश्राम, शालिग्राम कवाडे तसेच सर्व केंद्रीय शिक्षिका व सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महिला शाखा, जीवक बुद्ध विहार समिती, मैत्रेय बुद्ध विहार समिती या सर्वांनी उपस्थित राहून तालुकास्तरीय धम्म मेळाव्याला तन-मन-धनाने सहकार्य केले. व धम्म मेळावा यशस्वी केला. शेवटी सरणताय गातेने कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!