धामणगाव रेल्वे सामाजिक

गंगाजळीत १० दिवसीय उपासिका धम्म शिबीर उत्साहात संपन्न

उपसिकांनी मानले केंद्रीय शिक्षिका शशिकलाताई खैरनार यांचे आभार

धामणगाव रेल्वे

भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने संपूर्ण तालुक्यामधील १४ गावातील विहारामध्ये १६ जानेवारी ते २५ जानेवारी १० दिवसीय उपासिका धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे तालुक्यात सर्वात लहान गाव म्हणून गंगाजळी येथील विहाराचा देखील समावेश होता. ज्यात केंद्रीय शिक्षक म्हणून शशिकलाताई खैरनार यांची निवळ झाली होती. खर तर गंगाजळी सारख्या लहान गावामध्ये १० दिवसीय शिबीर होणे हे गावातील उपासक उपासिकेसाठी कौतुकाची बाब आहे. भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी धामणगाव रेल्वे यांनी गंगाजळी येथील नागरिकांवर दाखवलेला विश्वास पाहता गावातील नागरिकांनी सुद्धा संपूर्ण १० दिवस शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

केंद्रीय शिक्षिका शशिकलाताई खैरनार यांनी दिलेले ज्ञान प्रबोधन आजही आमच्या मनात – उपासिका, गंगाजळी 

गंगाजळी येथे शिबिराला लाभलेल्या केंद्रीय शिक्षिका शशिकलाताई खैरनार यांनी या १० दिवसात तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाविषयी सखोल असे ज्ञान प्रबोधन केले. तसेच विहार येण्याचे महत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणवून घेत त्या आत्मसात करण्यात आम्हाला मार्गदर्शन केले. सर्वात महत्वाचे म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, तर तुम्ही प्रत्यक्षात त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि नंतरच त्याचे अनुकरण करा. म्हणजे आपल्याला आलेली प्रचितीच आपला अनुभव म्हणून आपल्या पाठीशी राहणार असल्याचे मत त्यांनी मांडले. तर प्रत्येक दिवशी ताईंनी सांगितलेला घटनाक्रम आजही आमच्या डोळ्यासमोर आम्हाला जाणवत आहे. तसेच जी व्यक्ती विहारात येत नाही त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना विहारात येण्यास प्रवृत्त केले. असे उपस्थित उपासिकेनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे. त्यानंतर संपूर्ण गावात महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शांततापूर्वक रॅली काढण्यात आली. या रॅलीत विशेष म्हणजे ८५ वर्षाच्या आजी विमलबाई माटे यांनी सुद्दा सहभाग दर्शविला.

८५ वर्षीय विमलबाई माटे रॅली मध्ये सहभाग दर्शविताना

प्रत्येक उपासिकेने, लहान मुलांनी १० दिवसात आलेला अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील भारतीताई नरेश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेषतः महिला वर्गाने खूप मेहनत घेतली. यावेळीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी वानखडे तर आभार प्रदर्शन सुरज वानखडे यांनी केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!