बाभुळगाव पोलिसांची धडक कारवाई
बाभुळगाव प्रतिनिधी
दि. २२ जानेवारी रोजी ग्राम गवंडी येथून नांदुराकडे काही इसम 3 ते 4 जनावर एकत्र आखूड दोरीने बांधून त्यांना चारापाणी न करता निर्दयतेने पायदळ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती बाभुळगाव पोलिसांना मिळाली असता ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी पंचासमक्ष तपासणी करून त्यांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता उडवा उडवी चे उत्तरे देत होते. व जनावरे कत्तली करिता नेत असल्याचे सांगितले. म्हणून सोबत घेऊन गेलेल्या पंचसमक्ष घटनास्थळ पंचनामा करून ४८ गोवंश जातीचे (पांढऱ्या, धमण्या, व काळपट रंगाचे ४८ बैल ) प्रत्येकी किंमत ४० हजार प्रमाणे असा एकूण १९ लक्ष २० हजार .कि. चे गोवंश (बैल) मिळून आले. आरोपीतांवर प्राण्यांचा छेड प्रतिबंध अधिनियम कलम ११ (१) (A) (F) (H) बीएनएस, सह कायदा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ ,५ ,(A) ५ (B) ९ सहकलम ३ ,(५ ) बीएनएस आणि Mv Act ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था होणे करिता सुरक्षेच्या दृष्टिने सिद्धेश्वर गोसेवा सरूळ बागवाडी येथे जनावरे ठेवण्यात आलेली आहे.
यातील आरोपी क्र १. महादेव धर्माजी भोयर वय ६५ वर्ष रा. वाघोली ता. धामणगाव रेल्वे जी. अमरावती, २. रवींद्र देवबाजी मोकासे वय ४० वर्ष रा. जळगाव ता. धामणगाव रेल्वे जी. अमरावती, ३ . रामभाऊ नारायणराव काळे वय. ५५ वर्ष रा. झाडगाव ता. धामणगाव रेल्वे जी. अमरावती ४. प्रकाश सुरेशराव अर्जुने वय ३६ वर्ष रा. दत्तापूर ता. धामणगाव रेल्वे जी. अमरावती, ५. चंद्रशेखर महादेवराव गायकवाड वय ३ 7 वर्ष रा. देहगाव धांदे ता. देवळी जी. वर्धा याना ताब्यात घेण्यात आले आहे.












Add Comment