धक्कादायक धामणगाव रेल्वे

जळगाव आर्वीत मनमानी कारभार ; विनापरवानगी झाडाची कत्तल ; तरुण किरकोळ जखमी

झाड खांबावर पडल्याने ४ पोल जमीनदोस्त ; मोठी दुर्घटना

धामणगाव रेल्वे

तालुक्यानजीक असलेल्या जळगाव आर्वीत आज सकाळी मोठी दुर्घटना घडली असून सुदैवानी त्यात कोणतीही जीवित हानी घडली नाही. मात्र नितीन सहारे या युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या निमित्तानेच गावात सुरु असलेला मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातीलच एका व्यक्तीने परस्पर कुठलीही परवानगी न घेता झाडे तोडण्याचा ठेका दिला असल्याची प्राथमिक माहिती असून मजूर आज सकाळी ९ च्या सुमारास झाडे तोडत असताना ते महावितरणच्या खांबावर पडले असून एकूण ३ सिमेंट चे खांब पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून १ लोखंडी खांब मधातून वाकलेल्या स्थितीत आहे. सुदैवाने मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नितीन सहारे या युवकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाकलेला लोखंडी खांब 

जळगाव आर्वीत अचानक घडलेल्या या दुर्घटनेने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला तसेच महावितरण कंपनी ला कुठलीही माहिती न देता परस्पर कायदा हाती घेऊन मनमानी कारभार करणाऱ्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जमीनदोस्त झालेला सिमेंटचा खांब 

गावात सुरु असलेल्या झाड तोडण्याबाबत ग्रामपंचायत मधील कुणालाच माहिती दिली नसून, कुठलीही परवानगी घेतली नाहीगजानन काळमेघ, सचिव ग्रा. प. जळगाव आर्वी

जळगाव आर्वीतील झालेल्या दुर्घटनेत झाड तोडण्यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. झाड खांबावर पडल्यामुळे ३ ते ४ खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्ववत लाईन जोडणीसाठी लागणार सर्व खर्च संबंधितांकडून घेण्यात येईल. खर्च देण्यास तयार नसल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार परेश कन्नाठे – सहाय्यक अभियंता, धामणगाव रेल्वे 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!