धामणगाव रेल्वे

पोलीस कॉन्स्टेबल कु. प्रिया सलामे हिचे अल्पश्या आजाराने निधन ; विरूळ रोंघे गावावर पसरली शोककळा

कु. प्रिया सलामे मुंबई पोलीस दलात होती कार्यरत

धामणगाव रेल्वे –

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विरूळ रोंघे गावातील शेतकऱ्यांची मुलगी कु. प्रिया सलामे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर मुंबई येथे पोलीस कॉन्स्टेबल पदाला २०२३ मध्ये गवसणी घातली होती. घरातून सर्वात लहान असताना देखील तिचे स्वप्न मात्र मोठे होते तर आपल्या शेतकरी मायबापाला हलाखीच्या परिस्थीतूनच बाहेर काढण्याची जिद्द तिच्या मनात होती. त्यामुळे तिचे अतोनात प्रयत्न जिद्द चिकाटी च्या भरवश्यावर तिने मुबई पोलीस दलात अवघ्या २४ व्या वर्षी मजल मारली. त्यामुळे फक्त घरच्यांचेच नाही तर संपूर्ण गावाचे नाव तिने रोशन केले होते.
मात्र अवघे २ वर्ष सेवा देत असताना नशिबाला काही वेगळच मंजूर असल्याने अवघ्या २६ व्या वर्षी अल्पश्या आजाराने काल दि. ११ ऑक्टोबर रात्री ८ : ३० सुमारास राहत्या घरी तिची प्राणज्योत मावळली. तर तिची अंतिम यात्रा आज १ वाजता राहत्या घरून होणार आहे… दोन दिवसापूर्वीच तिला रुग्णालयातून घरी आणण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त आहे तर, एकीकडे अस्मानी संकटाची खंबीरपने दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात असा आघात झाल्याने सलामे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
प्रिया सलामे हिच्या कुटुंबात आई वडील सह मोठी बहीण ( विवाहित ) मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!