स्टोन क्रशरच्या जड वाहतुकी विरोधात संपूर्ण गावकरी एकवटले – पर्यायी रस्त्याची मागणी
धामणगाव रेल्वे –
गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव – रामगाव – धामणगाव रस्ता अत्यंत खराब झाला असताना नागरिकांमार्फत वेळोवेळी निवेदनामार्फत नवीन ट्रस्टची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रती कि.मी. ८० लाख रुपये खर्च करून करोडो रुपयांच्या रोडचे बांधकाम २०२४ मधे करण्यात आले. मात्र रोड बांधून पूर्ण एक वर्षसुद्धा झाले नसताना अवघ्या सहा महिन्यातच रोडचे “तीन तेरा नऊ अठरा” झाल्याने रोड बनण्यापूर्वी आणि रोड बनल्यानंतरही त्याच मरण यातना सोसाव्या लागत असल्याने रोड लगत असलेल्या गावकऱ्यांना मोठा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे काही दिवसाअगोदरच सदरच्या रोडने स्टोन क्रशर वरून होणाऱ्या जड वाहतुकीविरोधात वडगाव येथील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला नमविले होते. त्याचाच प्रत्यय दि. ११ सप्टेंबर रोजी आला असून संपूर्ण रामगाव येथील महिला – पुरुष, युवक – युवती यांनी रास्तारोको आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबल्याने एकच धावपळ उडाली..

रामगाव – धामणगाव रोड इस्टिमेट प्रमाणे नाही – नागरिकांचा आरोप
एकीकडे प्रती कि. मी. ८० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराने रोडचे बांधकाम केले. मात्र सहा महिन्यातच रोड ची ऐसी तैसी झाल्याने खरंच रोड इस्टिमेट प्रमाणे बनला का ? असा रास्त प्रश्न नागरिकांना पडला आला त्यामुळे संबंधित विभागाने उखडलेल्या रोडची तपासणी करून त्यामध्ये उणीव आढळल्यास त्याच ठेकेदाराकडून पूर्णतः रोड नवीन बनवून घेण्याची मागणी यावेळी ग्रा. प. सदस्य अतुल भोगे यांनी केली.














Add Comment