धामणगाव रेल्वे

जळगाव मंगरूळ शिवारात चोरीचे वाढते प्रमाण ; रात्रीची पोलीस गस्त घाला….

सरपंच मनोज शिवणकरांची मागणी

धामणगाव रेल्वे –

तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव मंगरूळ या शेतशिवारात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अक्षरशः चोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आधीच अस्मानी संकटामध्ये असलेला शेतकरी त्याच शेतीचे साहित्य चोरीला जात असल्याने त्यांच्या दुःखात जास्तीची भर पडल्याचे वास्तव समोर येत आहे.

त्याकरिता पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्याने जर संरक्षणासाठी रात्रीची गस्त घातल्यास चोरट्यावर आळा बसण्याची शक्यता आहे. त्याकरिता गावातील नागरिकांसह जळगाव मंगरूळ चे सरपंच मनोज शिवणकर यांनी पोलीस प्रशासनाला रात्र गस्त घालण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!