सामाजिक

ग्रामसभा न घेता बनावट अभिलेखे तयार करून प्रशासन व नागरिकांची फसवणूक ?

सरपंच, ग्रामसेवक व सदस्याचा भोंगळ कारभार ग्रा. प. सदस्यानेच केला उघड

प्रतिनिधी
ग्रामपंचायत वडगांव (काटी) सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य, कर्मचारी यांनी ग्रामसभा न घेता बनावट अभिलेखे तयार करून नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच तसेच ग्रामसेवकांनी कार्यकाळ नसताना सुद्धा अगोदरच्या वर्षातील बोगस बनावट अभिलेखे बनवल्याचे दिसूनआल्यामुळे निलाबाई काशिनाथ डोके (ग्रामपंचायत सदस्या) यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय तुळजापूर यांच्याकडे लेखी तक्रार करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत मध्ये होत असलेला भोंगळ कारभार ग्रा. प. सदस्यानेच उघड पडल्याने सदरच्या प्रकरणात दोषींवर काय कारवाही होते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तक्रार करतेवेळी निलाबाई काशिनाथ डोके सह माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी निलेश केवट, नागनाथ माळी, सूर्यकांत कांबळे, गणेश कांबळे, शाहू साखरे, गोडसे सर व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे पदाधिकारी गणेश पाटील, दत्तात्रय सोनवणे, सारिका चुंगे, दत्तात्रय डोके व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!