अमरावती

मातृदेवो भव । पितृदेवो भव । म्हणजे ‘माता-पिता हे देवासमान

आई-वडिलांची सेवा केल्याने तुम्हाला कुठे जायची गरज नाही घरात देवाचे (विठ्ठलाचे) आगमन होते म्हणजेच घरात सुख-समृद्धी येते. भक्‍त पुंडलीकाने आई-वडिलांची केलेली सेवा म्‍हणजे तपश्‍चर्याच होती पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्याच्यावर प्रसन्न झाला होता. तसेच मुलांनी आपल्या कर्तव्याने आपले आई-वडील वृद्धापकाळात त्यांची चांगली काळजी घेणे, त्यांची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांना आदर देणे, हे त्यांचे कर्तव्य आहे आपण भक्त पुंडलिक आणि श्रावणबाळ यांच्यासारखे कर्तव्य करू शकत नाही, पण आपण एक आदर्श मुलगा-मुलगी म्हणून आपण आपल्या आई-वडिलांन सोबत राहू शकतो आणि त्यांचा आदर करू शकतो…

         खरे देव आपले आई वडील आपल्याला कुठे जायची गरज नाही या जगामध्ये सर्व मिळू शकते आणि सर्व गोष्टी आपण विकत घेऊ शकतो पण आई वडील कधीच नाही जोपर्यंत ते जीवित आहे तो पर्यंत त्यांची सेवा करा त्यांचा आत्म्याला दुखवू नका प्रत्येकाकडून गलती होत राहते वृद्धा अवस्थेमध्ये त्यांच्या गलतीला नजर अंदाज करा पण आपल्या कर्तव्याला चुकू नका म्हणून मुला मुलींचं कर्तव्य आहे की आपल्या आई-वडिलांचा आदर करा..

शोगन सुनील धांदे
– ८२०८५०२६५३

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!