धामणगाव रेल्वे

विद्यार्थ्यांची टी. सी देण्यास शाळेची टाळाटाळ ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

कॅन्सरग्रस्त पीडित पालकांना माराव्या लागत आहे शाळेच्या चकरा

धामणगाव रेल्वे

आजपासून शैक्षणिक धोरण २५ – २६ सुरु झाले असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरु झालेली आहे मात्र तालुक्यातील एका शाळेत मुलाचे वडील आपल्या पाल्याची टी.सी. काढण्यासाठी अनेकदा आले असता त्यांना टाळाटाळ करीत असल्याचे बाब पालकांनी बोलून दाखविली आहे. आपल्या पाल्याला दुसऱ्या शाळेत टाकण्याचा विचार पालकांचा असून त्यासाठी टी. सी मिळणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र पूर्वीच्या शाळेतील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांची टी.सी देत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यातही विद्यार्थ्यांचे वडील हे कॅन्सरग्रस्त असून सुद्धा त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!