धामणगाव रेल्वे

बच्चू कडू च्या समर्थनात धामणगाव बंद ; विविध ठिकाणी निदर्शने

धामणगाव रेल्वे

मागील ५ दिवसापासून शेतकरी कर्जमाफी सह अन्य १७ मागण्यासाठी माजी राज्य मंत्री, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. विविध संघटनेचा, आमदार खासदारांचा सदरच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत असताना ५ दिवस उलटूनही या निगरगट्ट प्रशासनाने आंदोलनकर्त्याची दखल घेतली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बच्चू कडू च्या समर्थनात आंदालन सुरु आहे. तर बच्चूकडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनाची तीव्रता वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण येत असल्याचे चित्र आपल्यासमोर आहे.

प्रहारच्या बंद ला व्यापारी वर्गाची साथ

याच पार्श्वभूमीवर प्रहार पक्ष अमरावतीचे जिलाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात आज दि. १२ जून २०२५ रोजी धामणगाव बंद ची हाक पुकारली असता या बंद ला धामणगावातून चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले. तर प्रहाराच्या कार्यकर्त्याने विविध ठिकाणे निदर्शने करून प्रशासन विरुद्ध निषेध व्यक्त केला.

शास्त्रीं चौकात टायर पेटवून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

धामणगाव बंद च्या दरम्यान शास्त्री चौक येथे प्रहार कार्यकर्त्याच्या वतीने टायर जाळून निषेध नोंदविला. यावेळी बराच काळ दोन्हीकडील वाहतूक ठप्प होती. तर सदरच्या आंदोलनाला पोलीस प्रशासन ठाणेदार गिरीश थातोड यांच्या उपस्थितीत तगडा बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले असून त्यांच्यासमवेत धामणगाव तालुका अध्यक्ष सुरज गंथडे, निलेश जयसिंगपूरे, अक्षय धोपटे, शैलेश टाले, प्रशांत धोटे, अमर गायधने, बंडू भोयर, दीपक पारखंडे, प्रवीण रोहनकर सह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने सामान्यांचा अंत पाहू नये, अन्नत्याग आंदोलनाच्या संपूर्ण मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल – प्रवीण हेंडवे, जिलाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!