अकोला

कारवाई का केली म्ह्णून तलाठ्याची थेट नायब तहसीलदाराला जातीवाचक शिवीगाळ अन, जीवे मारण्याची धमकी

तलाठ्याविरुद्ध  ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; महसूल विभागात खळबळ

अकोला प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील पातुर येथील नायब तहसीलदार यांना गौण खनिज वाहतूक कारवाई का केलीस असं म्हणून चक्क तलाठ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यादरम्यान, पातुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरमाची अवैध गौण खनिज वाहतूक केली जात होती. यावर नायब तहसीलदार चव्हाण यांनी कारवाई केल्याने याच कारणावरून नायब तहसीलदारास जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आता या प्रकरणी पातूर तहसील कार्यालयातील तलाठी अमित सबनीस यांच्याविरुद्ध पातुरच्या पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अंतर्गत आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा तलाठ्या विरोधात दाखल केलाय अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. यादरम्यान ही घटना गुरुवारी सायंकाळी पातूर तहसील कार्यालयासमोर असलेल्या कॅन्टीनमध्ये घडली. “तू गौण खनिजाची कारवाई का करतोस” असे म्हणत नायब तहसीलदार चव्हाण यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद ५३ वर्षीय बळीराम तुळशीराम चव्हाण, नायब तहसीलदार पातूर, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
अकोल्याच्या पातुर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या पिंपरडोळी गावच्या शिवारात मुरुम वाहतूक करणाऱ्या दोन अवैध ट्रॅक्टरवर छापा टाकून ती वाहने पोलीस स्टेशन चान्नी येथे जमा करण्यात आली होती. ही बाब तलाठी अमित सबनीस यांच्या जिव्हारी लागली आणि थेट नायब तहसीलदार चव्हाण यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावर तत्काळ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे आणि विविध कलमान्वये पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी काल शनिवारी रोजी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र महसूल विभागात प्रशासकीय कामकाज करताना तलाठ्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला अर्थात नायब तहसीलदाराला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकचा तपास करत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!