धामणगाव रेल्वे

नगरपरिषदेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती रॅली

वृक्षारोपण आणि बीज गोळा कार्यशाळेचे आयोजन – ५०० बीज गोळ्यांची निर्मिती

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या वतीने आज एक भव्य जनजागृती रॅलीचे तसेच वृक्षारोपण आणि बीज गोळे तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुनम कळंबे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पार पडला.
नगर परिषद कार्यालय येथून सकाळी निघालेल्या रॅलीत प्लास्टिक बंदी निर्मूलन, ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये नगरपरिषद कर्मचारी, महिला बचत गट आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

रॅलीनंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याच कार्यक्रमांतर्गत आयोजित बीज गोळे तयार करण्याच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला. एकूण ५०० बीज गोळे तयार करण्यात आले असून, हे गोळे भविष्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणासाठी वापरले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी गोंडीक सर यांची नगरपरिषदेच्या पर्यावरणदूत म्हणून नेमणूक करण्यात आली.
मुख्याधिकारी पुनम कळंबे यांच्या कुशल नियोजनामुळे आणि कार्यतत्परतेमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण नगरपरिषदेचा कर्मचारी वर्ग, अधिकारीवर्ग आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. यामुळे धामणगाव रेल्वे शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
मुख्याधिकारी कळंबे यांच्या प्रयत्नांमुळेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण झाली असून, अशा उपक्रमांमुळे धामणगाव रेल्वे हे ‘हिरवे शहर’ म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!