क्राईम धामणगाव रेल्वे

धामणगाव तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

दि. ३० मे रोजी शहरात विविध ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरांना टार्गेट करीत नगदी तसेच सोने चांदीवर हात साफ केले आहे.
जुना धामणगाव परिसरातील विनोद गुणवंत भागवत वय – ५७ हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनाला गेले असता घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दाराचे कुलूप तुटले दिसले तसेच आत मध्ये बघितले असता सगळीकडे सामान अस्थव्यस्थ पडून होते तसेच आलमारीतील लॉकर मधील नगदी २० हजार मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी दत्तापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
तर दुसरीकडे वाढोणा येथील शेतकरी दिलीप वसंत उघडे वय – ४७, हे घरातील लाईन नसल्यामुळे आपल्या परिवारासह भावाकडे गेले होते. तेथून परत आले असताना त्यांना सुद्धा घराचे कुलूप तुटले दिसले, घरातील कपात उघडे दिसून आले आणि त्यातील कानातले, अंगठी, गोफ असा एकूण १३.५ ग्राम सोन्याचे दागिने तर ७ तोळे चांदीचे दागिने व नगदी १० हजार मिळून आले नाही, तर त्यांच्याच शेजारी राहणारे प्रशांत श्रावण तितरे यांच्या घरातील देवपूजा ठिकाणी ठेवलेली दानपेटी फोडून त्यामधून १० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. दिलेल्या तक्रारीवरून तळेगाव दशसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात घेतला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!