क्राईम धामणगाव रेल्वे

चप्पलेचा वाद, मारहाणीत पाडले दोन दात – गुन्हा दाखल

दत्तापूर; आठवडी बाजार परिसरातील घटना

धामणगाव रेल्वे –

येथील आठवडी बाजार परिसरात  शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपीने फिर्यादीचे दोन दात पाडल्याची घटना दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. शालिक बन्सोड, वय ४५ रा. आठवडी बाजार, दत्तापूर धामणगाव रेल्वे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
साविस्तर असे कि, लखन यमुदास परिहार वय – ५० वर्ष, रा. आठवडी बाजार, दत्तापूर, धाम. रे. हे आपल्या घरासमोर पलंगावर बसले असताना मोहल्ल्यातील कुत्र्याने आरोपी शालिक बन्सोड यांची चप्पल घेऊन फिर्यादीच्या पलंगाखाली येऊन बसला. याबाबत फिर्यादीला काहीच माहित नसताना आरोपी शालिक बन्सोड याने फिर्यादीला तू माझी चप्पल का आणली म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर थापडा आणि बुक्यांनी मारहाण केल्याने फिर्यादीच्या तोंडातील समोरचे दोन दात पडले असून तोंडातून रक्त निघाले तसेच आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात बी एन एस ११७ (२) ३५१ (२) ३५२ कलम ३२५,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासात घेण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!