शहरात आगमन होताच भव्य मिरवणूकसह सत्कार सोहळ्याचे आयोजन ; आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
नुकत्याच निकाल लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३०५ वी रँक संपादित करून धामणगावातुन पहिला आय. ए. एस. अधिकारी असल्याचा बहुमान रजत श्रीराम पत्रे यांनी मिळवला असून आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्याचे नाव गौरवणीत केले आहे. मेहनत जिद्द चिकाटी उराशी बाळगून रजत पत्रे यांनी आय. ए. एस. पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सगळीकडून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
दि. २७ एप्रिल रोजी दिल्लीवरून धामणगाव शहरात आगमन झाले असताना रजत यांच्या स्वागतासाठी अनेक नागरिकांनी आपली हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य अशी मिरवणकु काढण्यात आली असताना ठिकठिकाणी रजतचे पुष्पगुछ व हार अर्पण करून त्याचे स्वागत केले. तसेच ढोल ताश्याचा गजरात नागरिकांनी नाचत गाजत मिरवणुकीत सहभाग घेतला.














Add Comment