धामणगाव रेल्वे

गवंडी बांधकाम मजदुर युनियन व संघर्ष समिती च्या वतीने रुग्णांना फळ वाटप करून भीम जयंती साजरी

धामणगाव रेल्वे

संपूर्ण देशासह प्रत्येक गावागावात महामानवांची जयंती साजरी करण्यात आली असून गवंडी बांधकाम मजदुर युनियन व संघर्ष समिती च्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपरिषमध्ये असलेल्या पूर्णकृती पुतळाला मानवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे, येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रुग्णांना पण शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गवंडी बांधकाम मजदुर युनियनचे अध्यक्ष मनोज सापेकर व संघर्ष समिती धामणगाव रेल्वे चे अध्यक्ष, धीरज भैसारे, सचिव राजीक बेग, कोषाध्यक्ष डॉ. पवन झटाले सह अजिंक्य भारत व आवाज इंडियाचे प्रतिनिधी अरुण डोंगरदिवे व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्स चा संपूर्ण स्टॉप उपस्थित होता.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!