शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर प्रहार आक्रमक
धामणगाव रेल्वे
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमाफीची घोषणा दिली. मात्र निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त आणि फक्त पाने पुसल्या गेल्याची स्थिती असल्याकारनाने प्रहार पक्षातर्फे राज्यभर महायुती सरकार मधील आमदार खासदार यांच्या घरावर मशाल आंदोलन राबविले असून धामणगावात सुद्धा प्रहार जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे व तालुकाध्यक्ष सुरज गंथडे यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रताप अडसड यांच्या घरावर हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांचा हाती मशाल व भगवा झेंडा आणि गळ्यात निळा दुपट्टा घालत आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी, पेरणी ते कापणी पर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत घेण्यात यावी, दिव्यांगाना ६००० रूपये मासिक मानधन ईत्यादी मागण्या संदर्भात राज्यभर प्रहार चे आंदोलन करण्यात आले असून युती सरकाने निवडणुकीपुर्वी आपल्या घोषणापत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या मुद्याने पेट घेतल्याचे दिसून येत आहेत.














Add Comment