राजकीय

आदिवासी गोवारी समाजाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रतिनिधी –

आदिवासी गोवारी समाजाच्या सवलतीचा प्रश्न आमदार प्रताप अडसड यांनी वारंवार विधानसभेत मांडला गोवारी समाज बांधवांच्या संकटात ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर ओंकारखेडा येथील आदिवासी गोवारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज धामणगाव रेल्वे येथे भाजपात विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.

यावेळी अविनाश राऊत सह समाजातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आमदार प्रताप अडसड यांना मतदार संघातील सर्व आदिवासी गोवारी बांधव भगिनी व युवकांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी एल्गार चे चांदुर रेल्वे तालुका उपाध्यक्ष गजानन ठाकरे, आदिवासी गोवारी समाजाचे नेते कृष्णा चौधरी, मंगेश ठाकरे अविनाश नेवारे प्रफुल ठाकरे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!