झाडा येथील जिल्हा परिषद शाळा सलग पाचव्यांदा चॅम्पियन
धामणगाव रेल्वे –
तालुक्यातील जुना धामणगाव येथील तालुका क्रिडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात आदर्श यशवंत ग्राम झाडा येथील जिल्हा परिषद शाळेने सलग पाचव्यांदा चॅम्पियन चषक प्राप्त केले. तर माध्यमिक विभागात बोरगाव निस्ताने तर प्राथमिक विभागात जुना धामणगाव जिल्हा परिषद शाळेने अजिंक्य चषक प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला. शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येथील तालुका क्रिडा संकुलात करण्यात आले होते.या महोत्सवाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
सांस्कृतिक मध्ये झाडा तर निदर्शनेमध्ये शेंदूरजना खुर्द शाळेची भरारी
तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती जयश्री शेलोकार, माजी सभापती महादेव सोमोसे, सदस्य माधुरी दुधे, नरेंद्र रामावत, शुभम भोंगे, जयश्री ढोले, राजकुमार केला, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या राधा भूत, गोपाल भूत, गटविकास अधिकारी माया वानखडे, जुना धामणगावचे सरपंच विश्वेश्वर दिघाडे, उपसरपंच हर्षा तायडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या रेखा आमले, सेवानिवृत्त शिक्षक प्रमोद, सुरेखा शिडाम, सुधाकर उईके, अविनाश दुधे व आदी उपस्थित होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक धीरज जवळकार, शिक्षण विस्तार अधिकारी साबीर खान, नारायण अतकरे,सु नील रोंघे, केंद्रप्रमुख तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक जगदीशकुमार शिरसाट, केंद्र प्रमुख डी.एस.राठोड, नरेश पाटील, प्रफुल्ल डाफ व आदी उपस्थित होते.













Add Comment